तुम्ही लोकांशी कसे वागता, याची देवाला काळजी असते.

तुम्ही लोकांशी कसे वागता, याची देवाला काळजी असते.

“मला परमेश्वराचे संकल्पनिवेदन करण्याचे दान असले, सर्वप्रकारच्या रहस्यांचे गहन अर्थ आकलन होत असले आणि सर्व ज्ञान असले आणि जरी डोंगर हालविण्याइतका मजजवळ विश्वास असला, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.”

माझा ठाम विश्वास आहे की, आपल्या आयुष्यातील लोकांशी आपण कसे वागतो, हे देवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. देवाची लोकांवर प्रीती आहे आणि तो इच्छितो की, आपणही इतरांवर प्रीती करावी, हे त्याच्या सेवेचाच एक भाग आहे.

कदाचित लोक तुम्ही काय बोललात किंवा काय केले, हे विसरून जातील; परंतु तुम्ही त्यांना कसे वाटायला लावले, हे ते कधीही विसरणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीला असे वाटू द्या की, त्यांचे महत्त्व आहे आणि ते मौल्यवान आहेत. त्यांना प्रोत्साहन देणारे शब्द बोला, भेटवस्तू द्या आणि त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवा. लोक जे बोलतात ते आवडीने ऐकून घ्या; कोणी काही चांगले केले तर त्याचे मनापासून कौतुक करा आणि त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करा, कारण आपल्या सर्वांकडूनच चुका होत असतात. तुम्ही ज्या कोणाला भेटता, त्यांच्याशी सौम्य, सहनशील आणि प्रेमळपणे वागा. इतरांशी चांगले वागण्याचे अनेक मार्ग असू शकतात, परंतु त्या सर्वांचा मूळ अर्थ ‘प्रीती’ हाच आहे.

हे परमपित्या, मला लोकांना तुझ्या नजरेतून पाहायला शिकव. मला प्रोत्साहन देणारे शब्द बोलायला, इतरांच्या चुकांबाबत सहनशील राहायला आणि जशी तू माझ्यावर प्रीती करतोस, तशीच इतरांवरही मनापासून प्रीती करायला शिकव. आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *