“आत्म्याचा शोध करणारे का देहाचा शोध करणारे?”

"आत्म्याचा शोध करणारे का देहाचा शोध करणारे?"

“आत्म्याचा शोध करणारे का देहाचा शोध करणारे?”

वचन:

योहान 6:63

आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत.

निरीक्षण:

खरे जीवन कोठून येते हे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले. आत्मा आणि देह यांच्यात संघर्ष नेहमीच असेल हे त्याने त्यांना सांगितले. येशूने म्हणतो की त्याचे वचन आत्म्याने परिपूर्ण आहेत आणि त्यात जीवन आहे.

लागूकरण:

प्रत्येक “येशूच्या अनुयायाने” दिवसाची सुरुवात युध्द चालू आहे असा विचार करून केली पाहिजे. हे शरीर, जे मी लिहितो तसा क्षय होत चालला आहे आणि आत्मा, जो सदैव जिवंत आहे आणि अधिक जीवन निर्माण करत चालला आहे, यांच्यातील युद्ध आहे! क्षय पावणारा देह क्षय होत असलेल्या गोष्टींमध्ये पूर्णतेची इच्छा करतो. लैगिंक संबंध, पैसा, प्रसिद्धी या सर्वांचा नाश होत आहे. तरीही ते देहबुद्धीने केले जातात. आत्मा जीवन देतो. तरीही आत्म्याला ओळखणे किंवा त्याचा शोध घेणे कठीण आहे. आत्माचा शोध एकाच्या आत्म्याने झाला पाहिजे. हे कठीण आहे. तुम्ही “आत्म्याचा शोध करणारे का देहाचा शोध करणारे आहात?” ते फक्त तुम्हीच ठरवू  शकता.

प्रार्थना:

प्रिय येशू,

मला आज आत्म्याच्या गोष्टींचा पाठपुरावा करायचा आहे. मला आज तुमच्या मदतीची गरज आहे. आत्मा तयार आहे, परंतु देह कमकुवत आहे. परंतू प्रभू तू सर्वशक्तिमान आहेस मला तुझ्या आत्म्याच्या गोष्टी समजण्यास मदत कर व मला तुझ्या सत्याच्या मार्गाने चालव येशूच्या नावात आमेन.